वैतरणा नदीच्या काठावर बसलेले बालीवली व कळंभोली ही दोन गावे आहेत. हि दोन गावे महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील प्रगतशील व ऐतिहासिक गावे आहेत.
बालिवली व कळंभोली गावात हनुमानाची मंदिरे आहेत ही मंदिरे गावांची धार्मिक केंद्रबिंदू आहेत. सन २०११ च्या जनगणनेनुसार या दोन गावांची लोकसंख्या सुमारे ६६२ आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा २ , अंगणवाडी केंद्रे २ व सभामंडप-२ अशी शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत. तसेच गावामध्ये सन २०२३ पासून पिण्याच्या पाण्याच्या सोईने ग्रामपंचायत बालिवली – कळंभोली चे ग्रामस्थ पाण्याचा वापर पिण्यासाठी करतात,तसेच गावात पुरातन मंदिरे, सामुदायिक सभागृह, पाणीसाठवण, सार्वजनिक विहिरी व शेततळी अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत.
गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून भात, व भाजीपाला लागवड ही प्रमुख पिके घेतली जातात.
बालिवली – कळंभोली ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना घरकुल चा लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नांदणी.गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त आहे. जलसंधारण व पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे. तसेच तंटामुक्ती गाव मोहीम अंतर्गत देखील उत्कृष्ट काम केले आहे. ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ६ सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणला आहे. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.
बालिवली – कळंभोली ही दोन गावे गाव आज वाडा तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गावे म्हणून ओळखली जातात.